Friday, February 14, 2020

मोरगिरी किल्ला पदभ्रमण, भाग : - २

मोरगिरी किल्ला पदभ्रमण

भाग : - २

खरच आमचे सगळे अंदाज गडाची उंची पाहूनच चुकले होते. मी स्वतः माझ्या पायाच्या दुखापती नंतर मीच स्वतः २ वर्षा नंतर ट्रेक करत होतो. तरी मी माझा कर्डिओचा सराव चालू असल्या मुळे मला कॉन्फिडन्स होता मी हे निभावून नवीन. तो आत्मविश्वास असणं महत्वाचे असते. मिलिंद कुलकर्णी दादा मला बोलताना म्हणलेच तो मागचा उंचा दिसतोय तो डोंगर असेल ना तर मजा आहे. तेवढ्यात गडावरचा भगवा मस्त आनंदात फडकताना दिसलाच. 

आता मजा बघा गड किती उंच आहे ते. लोणावळा पासून घट चढून अँबी व्हॅली पठारावर आपण येतो, ह्या पठारावरून आपण जातो किल्ल्याच्या खालच्या पठारावर आणि ह्या पठारावरून आपण गडावर जातो. इतका उंच आहे गड दोस्तहो. सगळे तयार झाले. कॅमेरा बाहेर आलेलेच होते. शेवटी विजयने निघायचा कॉल दिला, तसे सगळे बॅगा घेऊन रेडी झाले. बेस पासून गडाची दिशा पहिली, अंदाज लावला आणि चालत सुटलो. सगळेच जण एका मागोमाग एक निघाले. थोडे पुढे गेल्यावर मागून एक हाक आली आणि समजले चुकलो!!!! सुरवातीलाच विकेट पडली. परत मागे, मग आम्हाला सांगितले की झाडावर रंगाच्या फिती लावल्या आहेत आणि बाण पण काढले आहेत. ते शोधत जा. अशा रित्या रस्त्याला लागलो. गप्पा टप्पा , फोटो काढत, जुन्या ट्रेकचे किस्से सांगत सगळे मस्त पणे पुढे चालले होतो. 

मी आधी पुढे होतो, हळू हळू मी, प्रशांत दादा आणि विशाल असे फोटो काढत काढत येत होतो त्यामुळे जरा मागे पडलो. मग पुढून जोरात हाक पडायची, "अरे येता का रे ?". जसे जसे पुढे जात होतो तसे तसे जंगल जास्तच घनदाट होत होते. हळू हळू वाकून जायला लागायचं आणि करावी इतकी घनदाट वाढलेली की अंग चोरून चालायला लागते. थोडाच पुढे गेल्यावर अचानक घळीचा रस्ता चालू होतो. घळीमध्ये मोठाले - मोठाले अजस्त्र दगड, फांद्या, झाडाची खोडे, पडलेली, तुटलेली आहेत. जरा पायाचा कस तपासला जातो ह्या जागी. अश्या जागी समजते तुम्ही किती तांदरुस्त आहात. कारण छातीवरचा चढ चालू झाल्यावर बरेचदा लोक खूप हळू होऊन जातात. 

साधारण ४५ मिनिट ते १ तासाच्या चढाईनंतर आपण पठारावर येतो. आता मोरगिरी जवळ आलेला दिसतो. जसे आपण पठारावर येतो तसे पठाराला थोडा वळसा मारून किल्ल्याचा पायथ्याला जाण्यासाठी बाण दिसतो. पठारावर खूप जोरात वाऱ्याचा मरा चालू होता. कोणी हलका माणूस असेल तर त्याला शक्यतो धरुनच ठेवा. हे पठार खूप लांब आहे . दिसायला सुंदर आहे. आमच्यातले मिलिंद कुलकर्णी दादा खूप पुढे निघून गेले होते. ते पठारावरून आम्हाला सहज दिसत होते. त्यांचा चालण्यावरूनाच समजले वर जाताना traverse ( तिरपी चढण ) आहे. खालून सगळेच सोप्पे वाटते. 

आम्हाला पुढे जायचा मार्ग मिळेना. म्हणून एक मोठा रस्ता जात होता तिथे मी आणि प्रशांत कोठावदे दादा वळलो. आम्ही परत चुकलो असे वाटत होते तेवढ्यात मला लाल फित लाकडाला बांधलेली दिसली. झाडाच्या पुढे जंगलात शिरल्यावर पुढची फित काही मिळेना. मग प्रभुरज थोडा पुढे चालत गेला दुसऱ्या बाजूला त्याला पुढची फित दिसली. जी होती नवीन मिळालेली पाऊलवाट तीच पकडून चालू लागलो. हळू हळू फिती मिळत गेल्या आणि अचानक रस्ता उजवीकडे वरच्या बाजूस वळला. ह्याच जागी आम्हाला असा दिसलं वरच्या बाजूला फिती तर आहेत पण मग खालच्या बाजूला जास्त फिती होत्या. म्हणजे आम्ही रस्ता चुकीचा निवडला होता. पठारावरून जिथं आत वळलो त्याचा थोडे पुढेच रस्ता असेल. येताना पाहू. वरच्या दिशेला चालू लागलो आणि चढण इतकी छातीवरची होती की आम्ही खूपच कमी वेळात जंगलातून वर येऊन कारवीच्या भागात आलो आणि आम्हाला पायवाट हळू हळू जरा घसरडी आणि वळणा वळणाची होऊ लागली, पाय घासरायला लागले, रस्ता कठीण वाटू लागला कारण एका बाजूला मस्त दरी होती. लगेच तीक्ष्ण उतार. त्यामुळे खूप सांभाळून चालत होतो सगळे. करावी संपली तिथून मागे पाहिले तर ज्या पठारावर होतो ते संपूर्ण पठार आमच्या मागे दिसत होते. जोराचे गार वारे असे काही वाहत होते की विचारू नका. पण विजय गुर्जर सगळ्यांना मस्त आधार आणि प्रोत्साहन देत होता. त्यामुळे खूप आधार मिळत होता. 

सगळेजण अवघड चढण चढून गडाच्या शिडीच्या शेजारी आलो. ह्या जागेवरून गडावरचा भगवा सुंदर फडकताना दिसत होता. ह्या जागी बारापैकी चांगली जागा उभा राहायला आहे. इथे पाण्याची ३ टाकी आणि १ देवाचे मंदिर आहे. शिडी खूप भक्कम लावली आहे. त्यावरून आपण वर जाऊन गोल फिरून गडाच्या माथ्यावर जातो. 

गडाचा माथा खूप छोटा आहे. अगदी ५०-६० पावले. सगळीकडून तशिल कडे आहेत. त्यामुळे शक्यतो मस्ती करू नये. गडावरून खूप मोठ्या प्रदेशावर लक्ष ठेवता येते. बराच मोठा मुलुख डोळ्याखाली येतो. लोणावळा, देवघर, तुंग, तिकोना आणि कोरीगड दिसतात. मी गेलेलो तेव्हा वातावरण खूप ढगाळ आणि धुके असलेले होते. हा किल्ला शक्यतो टेहेळणी साठी वापरला जात असावा. कारण ह्या गडावर फक्त पाण्याची टाकी आणि १ मंदिर दिसते. तोफा, तटबंदी, दरवाजे, बुरूज काहीच दिसत नाही. गडाच्या माथ्यावर २ टाकी आहेत. १ सुकलेले आहे १ आहे त्यात पाणी आहे. जरा आराम करून, आम्ही परत खाली शिडीपशी येऊन जेवायचा निर्णय घेतला. पण खाली येताना जास्त काळजीपूर्वक यावे लागत होते. इतरांच्या पेक्षा माझाच बूट खूप घसरत होता. सगळे आपले धरू धरू, आधार घेत, कुठे दगडाच्या बेचकीत, कधी पोटावर येऊन, कधी करावी पकडून हळू हळू जंगलाच्या दिशेने सुखरूप खाली आलो. 

मगाशी येताना जंगलात शिरल्यावर दुसऱ्या मार्गांनी आलेलो आता ठरवलेल्या मार्गानी जाऊ. तसे जात आम्ही पठारावर पोचलो. आणि समजले मगाशी जाताना थोडे पुढे आलो असतो तर इथूनच पटी लावलेली होती. असो, सगळे सुखरूप खाली आलेले होते. अवघड आणि धोक्याचा रस्ता संपलेला होता. खूप चालून आणि घाबरून गेल्यामुळे भूका जोराच्या लागल्या होत्या. पठारावर गोल करून मस्त गप्पा गोष्टी करत परत खाण्यावर आडवा हात मारला.

जेवण करून परत खाली जायचा मार्ग धरला. पठारावरून घळीच्या दिशेने पुढे गेलो. बघता बघता घळीच्या इथूनच मिलिंद कुलकर्णी आणि विजय गुर्जर पुढच्या पुढे निघून कुठे निघून गेले पत्ताच लागला नाही. घळी मध्ये मी, प्रबुरज, अनुराग, प्रशांत दादा आणि विशाल थोडे चुकलो. मार्ग काढत आणि दिशेचा अंदाज लावत आम्ही बरोबर जागी पोचलो. सगळे सुखरूप खाली आलेले होते. गडाच्या त्या traverse ( तिरपी चढण ) मुळे वेगळीच मजा आलेली. वेळेतच परतीच्या प्रवासाला लागलो. 

समाप्त
बेसकँप पासून चालायला सुरू करतो तेव्हा

घळीच्या आधी लागणारे घनदाट जंगल


घळ चालू होते तिथे


घळीमधून रस्ता काढताना प्रशांत कोठावदे


घळीतून रस्ता काढताना विशाल रघुवंशी

घळ संपून गडाच्या खालच्या पठारावर येतो आणि वर गड 


पठारावरून गडाच्या पायथ्याशी जाताना


गडाच्या पायथ्यला असलेले घनदाट जंगल त्यातून वाट काढताना प्रशांत कोठावदे


जंगल संपवून छातीवरची चढण घेत वर आलेले प्रशांत कोठावदे, प्रभूराज आणि विशाल रघूवंशी


Traverse ( तिरपी चढण ) संपवून मोठ्या अश्या आडव्या सपाट भागावर पाण्याच्या टाक्याच्या बाजूला विश्रांती घेताना विशाल रघुवंशी आणि विजय गुर्जर


शिडीच्या दिशेने जाताना आजुन १ पाण्याचे टाके आणि संभाळून पावले टाकताना प्रशांत कोठावदे


शिडी वरून पुढे गेलेला विजय गुर्जर


गडाच्या माथ्यावर 
डावीकडून प्रशांत कोठावदे, विजय गुर्जर, मिलिंद कुलकर्णी, प्रभूराज, अनुराग, विशाल रघुवंशी.


गडावर असलेली पाण्याची टाकी


गडावरचा भगवा 


परतीचा मार्ग 



1 comment: